नाशिक - नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या समर्पित आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.