Chhagan Bhujbal: मेरी क्या छबी, मै तो गरीब आदमी! मंत्री भुजबळाची मिश्किल टिपणी

मनोज जरांगे शिक्षण आणि संस्कृतीप्रमाणे बोलतात. माणसाने सुसंस्कृत असायला हवे, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
Minister Chhagan Bhujbal, officers and office bearers at the inauguration of Fire Brigade's Bamba.
Minister Chhagan Bhujbal, officers and office bearers at the inauguration of Fire Brigade's Bamba.

Chhagan Bhujbal : मनोज जरांगे शिक्षण आणि संस्कृतीप्रमाणे बोलतात. माणसाने सुसंस्कृत असायला हवे, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

‘मेरी क्या छबी, मै तो गरीब आदमी’, अशी मिश्किल टिपणी करताना जरांगेच्या पाठीमागे कोण आहे, हे शोधा, असे उत्तर मंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. (chhagan bhujbal comment on manoj jarange patil statement nashik news)

अचानकपणे येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांनी येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पत्रकारांनी जरांगे वारंवार तुमच्यावर बोलत असून, प्रतिमा खराब करीत असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी मिश्किलपणे उत्तरे दिली. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून ओबीसीत समावेश करणे चुकीचे असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

कालव्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना

पुणेगाव दरसवाडी ते डोंगरगावदरम्यानच्या कालव्याचे विस्तारीकरण, पाझरणाऱ्या लांबीला अस्तरीकरण आदी कामांसाठी २५० कोटी रुपयांची कामे तातडीने पूर्ण करा. येत्या पावसाळ्यात मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावमध्ये पोचवा, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. पाणी वाहून नेताना प्रामुख्याने अडथळ्यांची कामे येत्या सहा महिन्यांत पूर्ण झालीच पाहिजे, यादृष्टीने नियोजन करा. मी प्रत्येक आठवड्याला या कामांचा आढावा घेणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Minister Chhagan Bhujbal, officers and office bearers at the inauguration of Fire Brigade's Bamba.
Manoj Jarange यांचा Maratha Reservation साठी उपोषण करणाऱ्यांना आदेश, काय म्हणाले जरांगे?

अग्निशमन दलाच्या बंबाचे लोकार्पण

आणीबाणी सेवांचे बळकटीकरण निधीतून नगरपरिषदेस अग्निशमन दलाचा बंब दिला आहे. मंत्री भुजबळ यांच्या हस्ते बंबाचे लोकार्पण झाले. अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, बाळासाहेब गुंड, डी. के. जगताप, हुसेन शेख, शफीक शेख, मोहन शेलार, ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, विठ्ठल कांगणे, पुंडलिक होंडे, अर्जुन कोकाटे, तुळशीराम कोकाटे, संजय पगार, रावसाहेब आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुमित थोरात, मलिक शेख, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, अविनाश कुक्कर, संपत शिंदे, दीपक पवार, महेश गादेकर, विशाल परदेशी, गणेश गवळी, वाल्मीक कुमावत आदी उपस्थित होते.

येथे शिवसृष्टी साकारण्यात येत आहे. या कामाची भुजबळांनी पाहणी केली. ‘शिवसृष्टी’मुळे येवला शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. त्यामुळे या कामाचा मी सातत्याने आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Minister Chhagan Bhujbal, officers and office bearers at the inauguration of Fire Brigade's Bamba.
Maratha Reservation : काय आहे 9 टक्क्यांचा फॉर्म्युला? ओबीसी नेते हरिभाऊ राठोड मनोज जरांगेंच्या भेटीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com