येवला- काकांना विचारले तर बिघडले कुठे...शेवटी ते त्यांचे काका आहेत, पण अजितदादा बोलले ते कार्यकर्ते असलेल्या काकांविषयी असे सांगत चांगली गोष्ट आहे ना... काकांना विचारतात ते. माझा पुतण्या समीर देखील आम्हाला विचारतो, आनंदाची गोष्ट आहे..अशी मिस्कील टिपणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान नाशिकला पालकमंत्री नसले तरी कामे थांबली आहेत का?, कामे होतच आहेत असे सांगत त्यांनी गुगली टाकली.