Nashik Politics: सिंहस्थ कुंभमेळ्याची सूत्रे शिंदे, फडणवीस, पवारांकडे; छगन भुजबळ, भुसेंना दुय्यम स्थान

chhagan bhujbal, Dada bhuse and Girish mahajan
chhagan bhujbal, Dada bhuse and Girish mahajan

Nashik Politics: २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीची घोषणा करताना ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांना दुय्यम पदे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे सूत्रे ठेवली आहेत.

पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष पद, तर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची नियुक्ती राज्य शिखर समितीवर करण्यात आली आहे. (Chhagan Bhujbal Dada Bhuse and Girish Mahajan in secondary roles for Simhastha Kumbh Mela nashik news)

महाजन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष असले तरी त्यांच्यासाठी नाशिकमध्ये झालेली एऩ्ट्री महत्त्वाची मानली जात आहे. महाजन यांच्या पुनरागमननाने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने शिखर समितीसह सहाय्य ठरणाऱ्या समित्यांची घोषणा केली. शिखर समितीला सहाय्य करण्यासाठी चार समित्यांची स्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शिखर समिती राहील. समितीत एकूण अकरा मंत्र्यांचा समावेश असेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती, तर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची जिल्हास्तरीय समिती राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा मंत्र्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय शिखर समिती आहे.

chhagan bhujbal, Dada bhuse and Girish mahajan
Nashik Political News: शरद पवार-अनिल कदम यांच्या हवाई प्रवासाने निफाडच्या राजकारणात धुरळा!

त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार सदस्य असतील. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, उद्योगमंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे सदस्य राहतील.

महाजनांमुळे दोघांत तिसरा

ट्रिपल इंजिन सरकारची घोषणा झाल्यानंतर पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळविण्याच्या स्पर्धेत नाशिकचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी दादा भुसे, छगन भुजबळ व गिरीश महाजन यांच्या स्पर्धा होती व अजूनही आहे. सध्या भुसे पालकमंत्री आहेत.

परंतु त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते गेल्यानंतर पालकमंत्री बदलेल असे बोलले जात होते. मात्र तसे झाले नाही. भुजबळ यांनादेखील पालकमंत्रिपद हवे आहे. आता नाशिकवर अधिक प्रेम असणारे गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळा समितीच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणार असल्याने महाजन यांचे पुनरागमन भुजबळ, भुसे यांच्यासाठी धडकी भरविणारे असले तरी भाजपमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.

chhagan bhujbal, Dada bhuse and Girish mahajan
Maharashtra Politics: महायुतीतील घटक पक्षांची मन जुळणार; आता जिल्ह्याजिल्ह्यात राबलवाला जाणार हा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com