नाशिक : ‘‘देशातील ५४ टक्के ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. अनेक राज्यांत ओबीसी समाजाची अवस्था बिकट आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. लोकसंख्येच्या तुलनेत समाज विकासासाठी निधी मिळाला पाहिजे. कोणी आपल्या आरक्षणावर गदा आणत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे,’’ असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.