जुने नाशिक- द्वारका चौकाची पाहणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आली. चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसेल तर याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सिग्नल तोडून वाहने उभी होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.