नाशिक: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आहे. हाके यांनी संबंधित प्रकरणात गैरसमज निर्माण केला असून, तेच याबाबत खुलासा करणार आहेत, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. आमदार सुहास कांदे यांच्या पालकमंत्रिपदाच्या वक्तव्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया देणे टाळले.