fadnavis and bhujbal
sakal
नाशिक: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून नाराज असलेले राज्याचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात दंड थोपटण्याची भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली असताना नाशिकमधील ‘सीपीआरआय’ टेस्टिंग लॅब उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन व मंत्री भुजबळ यांनी एकाच विमानाने प्रवास केला. विशेष म्हणजे विमानतळापासून शिलापूरच्या उद्घाटन स्थळापर्यंत उभय नेत्यांनी गाडीतून सोबतच प्रवास केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.