

Cannot take next step regarding merger without consulting BJP
Sakal
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, आता या चर्चांमधील सर्वात मोठा राजकीय पेच समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक दौऱ्यावर असताना या विषयावर अत्यंत स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे.