रेशनचे धान्य वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा - छगन भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Summary

भुजबळ म्हणाले, की स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांची आम्हाला जाण आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या येतात. मात्र, मजुरांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही प्रयत्न करू

नाशिक : राज्यातील स्थलांतरित मजूर, कष्टकऱ्यांचे विविध प्रश्‍न आणि टाळेबंदीमधील अन्नधान्य पुरवठ्याची सद्यपरिस्थिती व उपाययोजनेबाबत मंत्रालयात बुधवारी (ता. २) अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न नागरी अभियान या संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रेशनमधून प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू- तांदूळ देण्यात येते. त्यात वाढ करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यात हरभरा डाळ, तूरडाळ आणि खाद्यतेलाचा समावेश आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. (Chhagan Bhujbal said that he will follow up with the Center Government to increase the ration grains)

राज्य सरकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, स्थलांतरित कामगारांच्या रेशनिंगच्या समस्या सुटाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे सांगत असताना भुजबळ म्हणाले, की स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांची आम्हाला जाण आहे. मात्र, स्थलांतरित मजुरांची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या येतात. मात्र, मजुरांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी प्रत्येक स्तरावर आम्ही प्रयत्न करू. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार छाननी करते. मात्र, त्याला सध्या कोरोनामुळे स्थगिती दिली आहे. जे कार्ड अपात्र होतील, अशा ठिकाणी योग्य आणि पात्र कुटुंबांना समाविष्ट करून घेतले जाईल.

विधवा महिलांना धान्य

विधवा महिलांना रेशनिंग मिळण्यासाठी तातडीने सरकारचा आदेश जारी केला जाईल. त्याचप्रमाणे शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. ज्या ठिकाणी गरज भासेल अशा ठिकाणी आम्ही शिवभोजनचा विस्तार करू, ज्या ठिकाणी गरज असेल, अशा ठिकाणांची नावे दिली, तर यात दुरुस्ती करण्यास मदत होईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले. विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव चारुशीला तांबेकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, रंजना कान्हेरे, मुक्ता श्रीवास्तव, विशाल जाधव, सुभाष लोमटे, तरूणा कुंभार, शुभदा देशमुख, चंद्रकांत यादव व अन्न नागरी अभियान संस्थेचे राज्यातील विविध भागातील कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.

chhagan bhujbal
नाशिक जिल्‍ह्यात दुपारनंतर बाहेर फिरण्यास मनाई; जमावबंदी आदेश लागू

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com