Chhagan Bhujbal | शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात गैर काय? : भुजबळ यांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal | शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात गैर काय? : भुजबळ यांचा सवाल

नाशिक : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्यांवर पांघरूण घालण्यासाठी विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा मुद्दा उचलून धरला आहे, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केली.

तसेच जनतेच्या प्रश्‍नात एकरूप होऊन ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काम केले. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणण्यात गैर नाही. त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, असा टोला श्री. भुजबळ यांनी लगावला. (Chhagan Bhujbal statement about sharad pawar being called janata raja nashik news)

पत्रकारांशी बोलताना श्री. भुजबळ म्हणाले, की अजित पवार यांनी संभाजीराजांचा अपमान केलेला नाही. संभाजीराजे यांनी स्वराज्याचे रक्षण केले असल्याने ते स्वराज्याचे रक्षक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

पण कुणाला धर्मवीर म्हणायचे असल्याचे ते म्हणता येईल. खरे म्हणजे, अजित पवारांचे वक्तव्य चुकीचे असते, तर विधानसभेत त्याचवेळी सांगायला हवे होते. ते दप्तरी घेणे चुकीचे होते. मात्र त्यासंबंधाने सभागृहात कुणीही बोलले नाही. इतिहासाबद्दल अधिकचे बोलण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण या प्रश्‍नांविषयी विचार करायला हवा.

हेही वाचा: Nashik Crime News : सीबीएस परिसरात तरुणावर कोयत्याने हल्ला

चौथी ते आठवीपर्यंत इतिहास शिकवावा

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा इतिहास खूप मोठा आहे. तो विद्यार्थ्यांना एक ते दोन पानांमध्ये मुलांना समजतो का? हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे चौथीपासून सातवीपर्यंतच्या शिक्षणात एकेक धडा असावा., असे सांगून श्री. भुजबळ यांनी निवडणुकांमध्ये एकत्र येण्याबद्दल आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, की निवडणुका आल्यावर प्रत्येकाला एकत्र यावे असे वाटते. कुणी प्रकाश आंबेडकर यांना, तर कुणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांना, तर कुणी रामदास आठवले यांना सोबत घेतल्याचे आपणाला दिसते.

रिपब्लिकन पक्षातील अनेक गटांनी एकत्र यायला हवे. सध्या ते शक्य दिसत नाही. त्याचप्रमाणे आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात. निवडणुकीवेळी एकत्र येतात. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' ही उक्ती त्यामागे असते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Dr. Amol Kolhe| छत्रपती शिवाजीराजे अन् संभाजी महाराजांना अकारण रोजच्या राजकारणात कुणीही ओढू नये: डॉ. कोल्हे

मुख्यमंत्र्यांनी कामाचा झपाटा कमी करू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या, काशी, रामेश्‍वरसह महाराष्ट्रातील अष्टविनायक, तुळजाभवानी, विठ्ठल-रुक्मिणी अशा साऱ्यांचे दर्शन घेऊन राज्यासाठी आशीर्वाद मागावेत. मात्र विकास कामांचा झपाटा मुख्यमंत्र्यांनी कमी करू नये, असे सांगायला श्री. भुजबळ विसरलेले नाहीत.

सगळीकडे उभे करा महाराष्ट्र भवन

उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येतात. कुणी आमचे उद्योग बळजबरीने नेतात. कुणी नमस्कार करून सवलती देतात. तसेच मुंबई हे उद्योगपतींचे हब असल्याने त्यांना ज्यांना न्यायचे असेल, त्यांनी न्यावे. सगळीकडे महाराष्ट्र भवन उभे करावे.

त्यास हरकत असण्याचे कारण नाही, असे सांगून श्री. भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी भूमिका मांडली. ते म्हणाले, की शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बाहेर पडल्यावर मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा भरून काढण्याचे काम उद्धव ठाकरे हे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळेल.

हेही वाचा: Nashik News : कारखान्यामधील NEEM योजना आता बंद! २३ डिसेंबरपासून योजनेची अंमलबजावणीला ‘खो’