Chhagan Bhujbal : के. चंद्रशेखर रावांचा विचार राज्यात करावा लागेल सर्वांना : छगन भुजबळ

‘बी टीम'बद्दल शरद पवारांचे विचार बरोबर
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

Chhagan Bhujbal : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न करताहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) माध्यमातून काम उभे करण्यास सुरवात केली.

त्यामुळे राज्यात त्यांचा सर्व राजकीय पक्षांना विचार करावा लागेल, असे सांगत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्री. राव यांचे प्रयत्न किती उपयोगी पडतात हे निवडणुकीनंतर समजेल, असेही म्हटले आहे. (Chhagan Bhujbal Statement on K Chandrasekhar Rao should be considered in the state nashik political news)

राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची ‘बी टीम' बीआरएस असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. त्यांचे हे विचार बरोबर असल्याचे सांगून श्री. भुजबळ यांनी श्री. राव यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्ल्युप्त्या विषयीची माहिती आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

तसेच मतदारांची संख्या वाढवण्यासाठी इतर समाजाला सामावून घ्यावे लागेल असा पुनर्उच्चार श्री. भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसची ‘इमेज' बदलण्यासाठी आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला विधिमंडळ नेता अथवा प्रदेशाध्यक्ष यापैकी एक पद द्यावे आणि दुसरे पद इतर समाजाला मिळावे.

आताच्या फळीतील जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अथवा सुनील तटकरे आणि जुन्या पिढीतील म्हणून आपल्या नावाचा विचार पक्षाने करावा. १९९१-९२ पासून मी पक्षाध्यक्ष पवार यांच्यासमवेत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : पुनर्विविनियोजनाची चौकशी करा अन्यथा न्यायालयात जाणार; भुजबळांचा भुसेंविरोधात पलटवार

पक्षाची स्थापना झाल्यावर तीन महिन्यात झालेल्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष पवार आणि मी सगळीकडे प्रचार केला होता. मात्र मला काहीही व्हायचे नाही हे तितकेच सत्य आहे. पक्षाध्यक्ष पवार हे यासंबंधाने निर्णय घेतील.

छगन भुजबळ म्हणालेत

० भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांचा एक उमेदवार दिल्यास सत्ता बदलू शकते

० छापा टाकून काटा काढण्याचे चालल्याचे मी कुठंतरी वाचले होते

० कोरोना काळात जनतेला वाचवणे महत्त्वाचे होते. त्यासाठी झटपट निर्णय घ्यावे लागले

० जिल्हा नियोजनच्या बचत निधी प्रकरणी आमदार उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal on Ajit Pawar : छगन भुजबळांना प्रदेशाध्यक्ष व्हायचंय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com