नाशिक- ठाकरे कुटुंब एका व्यासपीठावर येत असेल तर त्याचे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. मात्र, एकत्र आले म्हणजे राजकीय विचारही जुळले, असे समजणे चुकीचे ठरेल. त्यांच्या मनोमिलनाचे वास्तव काय आहे, हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.