लासलगाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित हनी ट्रॅप प्रकरणी ‘नो हनी, नो ट्रॅप’ असे स्पष्ट केले आहे, तरीही तुमच्याकडे काही सीडी असल्यास ती पोलिसांना द्या, पोलिस तपास करतील अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी येथे पत्रकार परिषदेत याप्रश्नी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना आव्हान दिले.