Chhat Puja: उगवत्‍या सूर्याला अर्घ्‍य देत उत्‍तर भारतीयांनी केली छटपूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd gathered at Ramkunda on Monday morning to pray to the sun.

Chhat Puja: उगवत्‍या सूर्याला अर्घ्‍य देत उत्‍तर भारतीयांनी केली छटपूजा

नाशिक : छठपूजेसाठी शनिवार (ता. २९)पासूनच उत्तर भारतीयांनी गंगा घाटावर गर्दी केली होती. तीनदिवसीय छठव्रताची चौथ्‍या दिवशी सोमवारी (ता. ३१) लाखो महिलांनी आपल्‍या कुंटुंबासहित उगवत्‍या सूर्याला सकाळी अर्घ्‍य देत छठपूजा व्रताची सांगता केली. (Chhat Puja performed by North Indians offering arghya to rising sun at goda ghat nashik news)

छटव्रत

महिलांनी तीन दिवस उपवास करून सायंकाळी मावळत्‍या सूर्याला अर्घ्‍य देत खीर पुरीचा नैवद्य दाखवून प्रसाद घेतला जातो. तसेच उपलब्‍ध सर्व फळे सुपात घेऊन चौथ्‍या दिवशी उगवत्‍या सूर्याला अर्घ्‍य देत व्रताची सांगता होते. तांदूळाच्या पीठापासून केलेल्या लाडूचा नैवेद्य दाखविला जातो.

छटव्रतात उसाचा प्रसाद महत्त्वाचा असतो. कार्तिक महिन्यात येणाऱ्या सर्व फळांचा नैवेद्य व अर्घ्‍य सूर्यदेवताला अर्पण केले जाते. सर्व फळे सुपात घेऊन गंगेच्या पाण्यात अंघोळ करून व गंगेच्या पाण्यात उभे राहून अर्घ्‍य दिले जाते. यात कुटुंबियांसहित महिला गंगाघाटावर एकत्रित येऊन, तसेच एकमेकींना सिंदूर लावत, फळाने ओटी भरून सौभाग्‍यसाठी प्रार्थना करतात. तसेच छटव्रताने मनोकामना पूर्ण होते, म्‍हणून या पूजेला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा: Achievement : दार्जिलिंगमधील खडतर गिर्यारोहण प्रशिक्षण आनंद बांगरने केले पूर्ण

लाखो भाविकांच्या चेहऱ्यावर पूजेचा उत्‍साह व आनंद दिसत होता. तसेच सूर्याला अर्घ्‍य दिल्‍यानंतर हजारो भाविक प्रसन्नतेने आपआपल्‍या गावी जाण्यासाठी सज्‍ज झाले होते. सकाळी गंगाघाटाला जणू यात्रेचे स्‍वरूप आले होते. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, म्‍हणून पोलिस बंदोबस्‍त होता. वेळोवेळी नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून सुविधेसाठी दिल्‍या सूचना दिल्या जात होत्या. छठपूजा शांततेत व मोठ्या उत्‍साहात झाली.

छटपूजा हे फलदायी व्रत आहे, तसेच हंगामातील सर्व उपलब्‍ध फळे सुपात घेऊन सूर्यदेवतेला चौथ्‍या दिवशी सूर्योदयावेळी अर्घ्‍य देऊन छटव्रताची सांगता होते. यात कुटुंबीय सहभागी होत असते. त्‍यामुळे पूजेचा आनंद व उत्‍साह मोठा असतो.

-रीमा शुक्‍ल, भाविक महिला

हेही वाचा: Nashik : जिल्हा बँकेची आजपासून वसुली मोहिम; 100 बडे थकबाकीदार रडारवर