सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भाविकांनी केली सुख-समृद्धीची प्रार्थना

सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भाविकांनी केली सुख-समृद्धीची प्रार्थना
Published on: 
सेकंडमेन शहर टुडे पान तीनसाठी (कृपया फोटो तीन कॉलम वापरावा) NSK26H35098 जळगाव : मेहरुण तलावाच्या गणेश घाटावर रविवारी आयोजित उत्तर भारतीय समाजबांधवांच्या छटपुजा सोहळ्यात सुर्याची पुजा करताना महिला. ------------- मेहरुण तलावाच्या काठावर छटपूजा उत्साहात --------- सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून भाविकांकडून सुख-समृद्धीसाठीची प्रार्थना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : सूर्योपासनेचा पवित्र सण असलेली छटपूजा शहरात रविवारी (ता.१५) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. उत्तर भारतीय समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने छटमातेची पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले. या सोहळ्यात महिला, पुरुष व लहान मुलांसह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पूजेसाठी आवश्यक साहित्य, फळे, फुले, ऊस, नारळ व पारंपरिक प्रसादाची तयारी केली होती. पूजेच्या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्य व आनंदासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. छटपूजा हा उत्तर भारतीय समाजाचा महत्त्वाचा धार्मिक सण असून, त्यात सूर्यदेव व छटमातेची आराधना केली जाते. महिलांनी निर्जळी उपवास करून श्रद्धेने पूजा केली. पारंपरिक छटगीतांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून रविवारी व्रताची सांगता करण्यात आली. या उत्सवामुळे शहरातील उत्तर भारतीय समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.