छठ पूजेसाठी रामकुंड-गंगाघाट परिसरात वाहतूक बंद

छठ पूजेसाठी रामकुंड-गंगाघाट परिसरात वाहतूक बंद
Published on: 
छटपूजेसाठी रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल १५ नोव्हेंबर दुपारी ३ पासून १६ नोव्हेंबर सकाळी १० पर्यंत निर्बंध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : रामतीर्थ आणि गंगाघाट परिसरात छटपूजेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत या परिसरातील प्रमुख रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. छटपूजेसाठी यंदा ५० ते ६० हजार भाविक येण्याचा अंदाज आहे. रामतीर्थ परिसरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच परिसरातील रहिवाशांच्या वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. या मार्गांवर वाहतूक बंद मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालय, खांडवे सभागृह, सरदार चौक, गणेशवाडी आणि दिल्ली दरवाजा-रोकडोबा मैदान या मार्गांवरून रामतीर्थाकडे जाणारी व येणारी वाहतूक बंद राहणार आहे. भाविकांसाठी गणेशवाडी-काट्या मारुती पोलिस चौकी-निमाणी बसस्थानक-पंचवटी कारंजा हा पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. पार्किंगची व्यवस्था भाविकांच्या वाहनांसाठी गौरी पटांगण आणि शिंदे मळा येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गौरी पटांगणात जाण्यासाठी मालेगाव स्टँड-पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका-सेवाकुंज चौक-काट्या मारुती चौक-देवी मंदिर-मुंजोबा चौक-आयुर्वेद रुग्णालय-मरी माता मंदिर हा मार्ग वापरावा. शिंदे मळ्यात जाण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्ग-ट्रॅक्टर हाऊस-नानावली पोलिस चौकी-अमरधाम पूल किंवा काट्या मारुती चौक-देवी चौक-पंचवटी अमरधाम या मार्गांचा वापर करता येईल. भाविकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.