छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; Padma Bhushan राम सुतार साकारताय 21 फूट उंच पुतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Nitin Pawar, Kautik Pagar, Bhushan Pagar and others during the meeting of Padma Bhushan Ram Sutar

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात; Padma Bhushan राम सुतार साकारताय 21 फूट उंच पुतळा

कळवण (जि. नाशिक) : शहरात साकारण्यात येत असलेल्या शिव स्मारकात स्थापना केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच २१ फुट पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या पुतळ्याची निर्मिती करत असलेले प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांची दिल्ली येथे शिवस्मारक समितीच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. (Chhatrapati Shivaji Maharaj statue work in final stage Padma Bhushan Ram Sutar making 21 feet tall statue nashik news)

दिल्ली येथे राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे काम सुरू असून हा पुतळा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. पद्मभूषण राम सुतार आणि शिल्पकार अनिल सुतार यांनी यावेळी शिवस्मारक समिती सदस्यांना माहिती दिली.

कळवण - सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते शिल्पकार राम सुतार यांचा सत्कार करण्यात आला. कळवण चे नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते शिल्पकार अनिल सुतार यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nylon Manja Ban : खबरदार! नायलॉन मांजा विकाल तर थेट तडीपार व्हाल!

यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, तहसीलदार बंडू कापसे, दिंडोरी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, कळवण पोलिस निरीक्षक समाधान नागरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदींसह राजेश पगार, अविनाश पगार, रवींद्र पगार, राकेश हिरे, बाळासाहेब गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, राहुल पगार, परेश कोठावदे, हरीश जाधव, रंजन देवरे, ललित आहेर उपस्थित होते.

"कळवण येथे साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे."

- भूषण पगार, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती

हेही वाचा: SAKAL Exclusive : प्राथमिक शिक्षकांच्या मदतीला Vinoba App!