NSK26H35021
जळगाव : छावा संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे.
-----------
‘छावा’ची जळगाव महानगर,
तालुका कार्यकारिणी जाहीर
महानगराध्यक्षपदी उज्ज्वल पाटील
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१४ : छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव महानगर व जळगाव तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महानगराध्यक्षपदी मेहरूण येथील सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वल पाटील, तालुकाध्यक्षपदी ममुराबाद येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक डॉ. राकेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हे यांनी जळगाव महानगर व जळगाव तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
जळगाव महानगर कार्यकारिणी अशी : महानगराध्यक्ष उज्ज्वल पाटील, महानगर उपाध्यक्ष सतीश पाटील, संजय सांगळे, महानगर सचिव हितेंद्र टेकावडे, कायदेविषयक सल्लागार ॲड. विक्रम महाले, सहसचिव नंदू बडगुजर, जयंत गोंधळी, चंद्रशेखर महाले, यशोदीप धुमाळ. सक्रिय सदस्य मनोहर बडगुजर, कल्पेश वाणी, कृष्णा जमदाडे, सागर मोतीराळे, भीमराव सोनवणे, आनंद महीरे, राजू कोळी, सागर कुटुंबळे.
जळगाव तालुका कार्यकारिणी : तालुकाध्यक्ष डॉ. राकेश पाटील, उपाध्यक्ष गणेश तायडे, डॉ. ललित कोतवाल, सचिव मयूर जावळे, सहसचिव आचल भदाणे.
सक्रिय सदस्य म्हणून डॉ. किरण तायडे, डॉ. विशाल साळुंखे, डॉ. नीरज सोनवणे, सचिन पाटील, तन्मय राणे, निरंजन पाटील.
-------