फोटो : NSK26H31929
नंदुरबार : निवासी जिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देतांना आरीफ कमर शेख, अरूण रामराजे, आप्पा वाघ, सुनील साळवे, गौतम इंदवे, नाना ठाकरे आदी.
-------------
मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा
विविध पक्ष, जनसंघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक विकास परिषद व जिल्ह्यातील विविध पक्ष व जनसंघटनांतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
राष्ट्रपतींच्या नावाने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र केंद्रीय निवडणुक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी एसआयआरच्या माध्यमातून लाखो नागरीकांचा हा अधिकार हिरावून घेतला आहे. पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे नागरीकांचे अधिकार हिरावून घेणाऱ्या मुख्य निवडणुक आयुक्तांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अल्पसंख्यांक विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आरीफ कमर शेख, अरूण रामराजे, आप्पा वाघ, सुनील साळवे, गौतम इंदवे, नाना ठाकरे आदींची नावे आहेत.
कार्यकर्ते आंदोलनासाठी दिल्लीला रवाना
दरम्यान, दिल्ली येथे एसआयआरच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील १० ते १५ कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आरिफ शेख यांनी दिली.