Nashik News : राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आशिमा मित्तलांकडून झाडाझडती!

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal while taking information about the functioning of primary health center
Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal while taking information about the functioning of primary health centeresakal

येवला (जि. नाशिक) : राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली. अन्‌ येथील कामकाज पाहून त्यांनी अवाक्‌ होत संताप व्यक्त केला.

एकही अधिकारी कर्मचारी येथे राहत नाही, दोन वर्षात प्रसूतीच नाही, कुठलेही रेकॉर्ड नाही, भौतिक सुविधांचा अभाव, अशा एक नव्हे तर असंख्य समस्या आढळून आल्याने त्यांनी तब्बल तासभर अधिकारी- कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कानउघाडणी केली.

कामकाजात सात दिवसात सुधारणा करावी, अन्यथा कारवाईचा इशाराही दिला. (Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal while taking information about functioning of primary health center nashik news)

राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशिमा मित्तल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी अचानक भेट दिली. गेल्या दोन वर्षापासून राजापूर व परिसरातील लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळते, ऑपरेशन थिएटर, डिलिव्हरी रूम उपलब्ध असून त्यात सुविधा नाही.

या आरोग्य केंद्रात पाण्याची व्यवस्था असून एक वर्षापासून या आरोग्य केंद्रात एकही प्रसूती झालेली नाही, येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पाहून आशिमा मित्तल यांनी हातच टेकले. ओपीडी, औषध निर्माता कर्मचारी पद रिक्त असून दोन वैद्यकीय कार्यरत असून एक वैद्यकीय अधिकारी रजेवर आहे.

त्यामुळे डॉ. कुंटे यांच्यावर संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सध्या आहे. हे दोन्ही अधिकारी रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत नाही. गंभीर म्हणजे दुपारी चारनंतर एकही कर्मचारी या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहत नाही. रात्रीच्या वेळेला परिचारिका नाही.

अशा अनेक समस्या या उपकेंद्रात गेल्या कित्येक दिवसापासून भेडसावत असून अधिकारी व संबंधित कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मित्तल यांच्या लक्षात आल्याने आठ दिवसात या आरोग्य केंद्राची सुधारणा झाली नाही तर पुढील कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal while taking information about the functioning of primary health center
Nashik News: सौरऊर्जा प्रकल्पासाठी चक्क वनजमिनीची खरेदी विक्री; व्यवहार रद्द करण्याची वनविभागाची मागणी

आरोग्य केंद्रातील दप्तराची तपासणी

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दप्तर तपासणी केली असता बरेच दप्तर अपूर्ण अवस्थेत असून कोणताच ताळमेळ लागत नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर अनेक रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषध आणण्यासाठी कर्मचारी पाठवत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.

रुग्णांना फोन करून याची पडताळणी केल्यावर यात आशिमा मित्तल यांना सत्यता आढळली. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अण्णासाहेब मुंडे यांनी आरोग्याधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी केली असून समता जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांनी इमारत गळती व इतर समस्या सोडविण्याची मागणी केली.

सर्व अधिकारी व कर्मचारी येथे राहिले पाहिजे व रुग्णांना सुरळीत सेवा मिळाली पाहिजे अशी मागणी माजी उपसरपंच सुभाष वाघ यांनी यावेळी केली. यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अन्सार शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी, श्री. जोशी, माजी सभापती पोपट आव्हाड, प्रमोद बोडके, रामभाऊ केदार, सरपंच वंदना आगवन, शरद आगवन, दत्ता सानप, लक्ष्मण घुगे, योगेश गंडाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद काकडे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal while taking information about the functioning of primary health center
Sinnar Bus Accident : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com