CM Fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम पुन्हा सुरू; तरुणांना या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

CM Fellowship
CM Fellowshipesakal

नामपूर (जि. नाशिक) : राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या अभिनव उपक्रमाचे नाव आहे, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम.

यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची २ मार्च शेवटची तारीख आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला-मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. (Chief Ministers Fellowship program resumed Youth can apply till 2nd march nashik news)

२०१५ ते २०२० या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करिता अर्ज करण्यासाठी वय २१ ते २६ वर्षांदरम्यान असावे. ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव, असे किमान निकष आहेत. ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल.

आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

CM Fellowship
Vadangali Yatrotsav : वडांगळीच्या यात्रोत्सवात लाॅकडाऊन नंतर व्यापाऱ्यांनी साधली पर्वणी

आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (ॲकॅडमिक पार्टनर) आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून, काही शंका असल्यास cmfellowship-mah@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

CM Fellowship
Nashik News : मालेगाव महापालिका प्रवेशद्वारावर आमदारांना रोखले! कार्यकर्ते संतप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com