चिखलओहोळ शिवारात
वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावरील चिखलओहोळ (ता. मालेगाव) शिवारात रिलायन्स बायो गॅस कंपनीजवळ मनोज नानासाहेब दुशिंग (वय ४०, रा. शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर) यांना मालेगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून जबर धडक दिली. अपघातात मनोज हे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. २५ ऑक्टोबरला दुपारी चारला हा अपघात झाला. मृताची पत्नी सविता मनोज दुशिंग (रा. शिर्डी) यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
-----
सौंदाणेत शिवारात
एकाचा मृत्यू
मालेगाव : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील बाबुलाल दशरथ पवार (वय ५५) यांची २९ ऑक्टोबरला दुपारी तीनला अचानक तब्येत बिघडली. त्यांना उपचारासाठी सुर्यवंशी हॉस्पीटल येथे नेले. पुढील उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. निलेश शेलार यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
-----
टिंगरी गावात
दुचाकी लंपास
मालेगाव : टिंगरी (ता. मालेगाव) येथील दत्तु पितांबर आहिरे (वय ४३) यांची ५० हजाराची दुचाकी (एमएच ४१ बीयु ६८६६) चोरट्यांनी चोरुन नेली. १३ ऑक्टोबरला मध्यरात्री एकच्या ते पहाटे पाचच्या दरम्यान घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
इस्लामाबाद भागात
ऑटोरिक्षाची चोरी
मालेगाव : येथील इस्लामाबाद भागातील कासिब शेख (वय ३६) यांची ५० हजाराची ऑटोरिक्षा (एमएच ४१ बी ३०६५) चोरट्यांनी चोरुन नेली. ३० ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.