Child Adoption
sakal
नाशिक: महिला व बालविकास विभागाच्या शासनमान्य घारपुरे घाटानजीक असलेल्या आधाराश्रमात कोविड काळापूर्वी २०-२५ मुले वर्षाला दत्तक जात होती; परंतु कोविड काळानंतर आश्रमात मूल येण्याचे प्रमाण घटल्याने मूल दत्तक जाण्याचे प्रमाण आता वर्षाला आठ ते दहावर आले आहे. विशेष म्हणजे दत्तक प्रक्रियेत लेकीला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याने गेल्या पाच वर्षांत ३१ मुली, तर २९ मुले आश्रमातून दत्तक देण्यात आली आहेत.