तब्बल १५ टक्के मुलांमध्ये मधुमेहपूर्व अवस्था

तब्बल १५ टक्के मुलांमध्ये मधुमेहपूर्व अवस्था
Published on: 
टुडे १, मेन ----- (समर्पक स्केच वापरावे) -- लोगो : जागतिक मधुमेह दिन ---- बापरे.. तब्बल १५ टक्के मुलांमध्ये मधुमेहपूर्व अवस्था! उपशीर्षक वाढते प्रमाण चिंताजनक; बदलती जीवनशैली, मैदानी खेळांपासून दूर गेल्याचा परिणाम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : पूर्वी प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळणारा ‘टाइप-२’ मधुमेह आता लहान वयोगटातही दिसून येत आहे. भारतात २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका राष्ट्रीय अभ्यासानुसार, शालेय वयोगटातील ०.९४ टक्के मुलांमध्ये मधुमेह, तर १५.३५ टक्के मुलांमध्ये मधुमेहपूर्व अवस्था आढळली. किशोरवयीन मुलांमध्येही हे प्रमाण लक्षणीय आहे. बदलती जीवनशैली, जंकफूड, शीतपेयांचे सेवन आणि मैदानी खेळांपासून मुलांनी दूर जाणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर जशी आधारित आहे, तसे भारतात आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या असून त्यामुळेच भारतातील फार्मा बाजारपेठ नेहमीच तेजीत असते. गेल्या काही वर्षांत कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील सदस्याची जीवनशैली बदलली असून त्यामुळे विविध नवीन रोग, व्याधी कमी वयातच शरीराला जायबंदी करत असल्याचे प्रमाण कमालीचे वाढलेय. १४-१ मधुमेह सामान्य आजार भारतासारख्या क्रमांक एकची लोकसंख्या असलेल्या देशात मधुमेह आता सामान्य आजार म्हणून मानला जात आहे. प्रत्येक दहा भारतीयांमागे सहा जण मधुमेह अथवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे जगभरात भारताची ‘मधुमेहींचा देश’ अशी नवी ओळख निर्माण होतेय. १४-१ मुलांमधील प्रमाण चिंताजनक गेल्या काही वर्षांत भारतामध्ये लहान बालकांपासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मधुमेह आणि मधुमेहपूर्व अवस्थेचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. जळगावसारख्या शहरात एका बालरोग तज्ज्ञाकडे तीन-चार महिन्यातून एखादा बालक मधुमेही किंवा मधुमेहपूर्व अवस्थेत दाखल होत असते. आता दर महिन्याला अशा दोन- तीन केसेस तरी येतात, असे सांगितले जाते. १४-१ ही आहेत कारणे - बदलती जीवनशैली, - जंक फूडचे वाढते प्रमाण - शीतपेयांचे अतिसेवन - मैदानी खेळांचा अभाव - मोबाईल- टीव्हीसमोर अधिक वेळ घालवणे - लठ्ठपणा आणि आनुवंशिकता - झोपेच्या अनियमित सवयी ----- ही आहेत लक्षणे - लहान वयातच नजर कमी होणे - वारंवार लघवी होणे - खूप तहान लागणे - वजन अचानक कमी होणे - थोडे चालल्यानंतरही थकवा जाणवणे ----- हे आहेत उपाय - मुलांचा स्क्रीन टाइम अत्यल्प हवा - वेळेवर जेवण, वेळेवर व पुरेशी झोप आवश्‍यक - दररोज किमान १ तास मैदानी खेळ गरजेचे - थकवा, घाम येईल तोपर्यंत खेळावे - जंकफूड, शीतपेये टाळणे योग्य - प्रत्येक वाढदिवसाला आरोग्य तपासणी आवश्‍यक ------ कोट.. अलिकडच्या काळात लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढतेय. पालकांमध्ये याबाबत खूप कमी जागृती आहे. त्यामुळे अनेकदा अशा आजारांची तीव्रता वाढल्यानंतरच रुग्ण आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पालकांनी मुलांमधील शारीरिक बदल, त्यांचे जेवण, झोप अशा गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेळ निघून गेल्यानंतर उपचार करणे जिकरीचे होते. ज्यांची मुले ५ ते १२ वर्षे वयोगटातील आहेत, त्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. - डॉ. अविनाश भोसले बालरोग तज्ज्ञ, जळगाव ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.