Infectious Disease: संसर्गजन्य आजाराने चिमुकले बेजार; बालरोग तज्ज्ञांचे पालकांना दक्षता घेण्याचे आवाहन

Doctor
Doctoresakal

Infectious Disease : वातावरणात वारंवार बदल होत असल्याने काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. हा व्हायरल फिव्हर लहानग्यांनाही होत आहे.

त्यामुळे सर्दी, खोकल्याने चिमुकलेही जाम झाले आहेत. हा फिव्हर पालकांनी दुर्लक्ष न करता दक्षता घेणे गरजेचे आहे. (Children sickened by infectious diseases Pediatricians appeal to parents to be vigilant nashik)

सध्या पावसाळ्याचे दिवस असून, विषाणूजन्य आजारांमुळे श्वसनाचा त्रास, सर्दी, ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

सर्दी-खोकला, जुलाब, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी, अशा तक्रारीत वाढ झाली असून, अनेक बालरुग्ण उपचारांसाठी येत आहेत, अशी माहिती बालरोग तज्ज्ञांनी दिली.

शाळकरी मुले दिवसभर एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग वाढत आहे. लहान मुलांमध्ये ९९ ते १०४ अंश फॅरनहाइटपर्यंत ताप वाढत आहे.

लहान मुलांना संसर्ग झाल्यास पालकांनी तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. न चुकता संसर्ग होऊ नये, म्हणून पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

फ्लूचे डोस घेणे, नियमित लसीकरण, हातांची स्वच्छता, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे, मास्कचा वापर, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश गरजेचा आहे.

मूल आजारी असेल, तर मुलांना शाळेत पाठवणे टाळा, मुलांचे हायड्रेशन आणि न्यूट्रिशनचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Doctor
Jalgaon Lumpy Disease : चाळीसगावात जनावरांना ‘लंपी’ची लागण; पशुपालकांना न घाबरण्याचे आवाहन

काविळीची साथ वाढतेय

सध्या पावसाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचे जंतू संसर्ग आजारांची साथ पसरते. पाऊस कमी असल्याने डेंगी, कावीळ, मलेरिया व टायफाईड हे संसर्ग आजार वाढत आहेत. याच दिवसात पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

कारण याच ऋतूतील वाढत्या आर्द्रतेमुळे जंतूंची संख्या वाढत असते. सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून डेंगीची साथ, कावीळ, अनेक फीवर प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Doctor
Onion News: नामपूरला 30 हजार क्विंटल कांद्याची आवक! 2 हजार 100 ते 2 हजार 350 रुपये प्रती क्विंटल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com