फोटो : NSK26H34169
नंदुरबार : जिल्हा पोलिस अधिक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील व पदाधिकारी.
----------------
चिनी बनावटीचे फटाके
विकणाऱ्यांवर कारवाई व्हावी
नंदुरबार, ता. २ : चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत. त्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चिनी फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याकडे हिंदु सेवा सहाय्य समितीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये घातक विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करण्यासाठी पोटॅशिअम क्लोराईड आणि पोटॅशिअम परक्लोराईड यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते. भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असतांना चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्याची विक्री होत आहे. त्यावर कारवाई करून विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, पंकज मुसळे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते.