दोन गटांत धुमश्चक्री

दोन गटांत धुमश्चक्री
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- चितोडमध्ये दोन गटांत धुमश्चक्री - दगड, कोयते- तलवारी चालल्याने पोलिसांसह ६ जखमी - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ४ : सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य प्रसारित केल्याच्या वादातून शहरालगत चितोड येथे मंगळवारी (ता. ३) दुपारी दोनच्या सुमारास दोन गटांत उडालेल्या धुमश्चक्रीत दगड, कोयते आणि तलवारीचा सर्रास वापर करण्यात आला. या हिंसक संघर्षात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चितोडे येथील २२ जणांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी सोशल मीडियावर समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह वक्तव्य प्रसारित केले होते. या वादातून चितोडे येथील प्रतिश मित्र मंडळ चौक परिसरात मंथन मोरे याला आकाश मोरे याने डोक्यात दगड मारून जखमी केले. त्यानंतर वादाचे लोण पसरल्याने दिनेश ढवळे याने कोयत्याने आकाश मोरे, रोहित वाघ यांच्या डोक्याला व कैलास बडगुजर यांच्या पाठीवर व हातावर वार करून जखमी केले. तसेच मंथन ढवळे याने तलवारीने वार करीत रोहित वाघ याच्या उजव्या हाताचे मनगट गंभीर जखमी केले. - पोलिसांवर हल्ला दोन्ही गटांमधील वाद सोडविण्यासाठी व जमावाला शांत करण्यासाठी गेलेले हवालदार संदीप शिंदे आणि हवालदार प्रवीण धनगर यांच्यावरही जमावाने हल्ला केला. त्यांना हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली असून, यात दोन्ही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. - २२ जणांवर गुन्हा याप्रकरणी हवालदार संदीप शिंदे यांच्या फिर्यादीनुसार आकाश हिलाल मोरे, रोहित उर्फ फुटक्या रवींद्र वाघ, भटू सोमदास वाघ, कैलास लहू बडगुजर, भैया वाघ, दिनेश मदन गायकवाड, विनय संजू वाघ, राकेश हिलाल अहिरे, मुकेश राजेंद्र अहिरे, अक्षय प्रकाश जाधव, दिनेश हिलाल ढवळे, मनोज ढवळे, संजय ढवळे, विलास ढवळे, मंथन ढवळे, मनीष ढवळे, भैया ढवळे आणि अन्य पाच जण (सर्व रा. चितोडे, ता. व जि. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक खालेद सय्यद तपास करीत आहेत. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.