यंदा मुलांना चॉकलेट फटाक्यांचे आकर्षण! हुबेहूब फटाक्यांचा आकार; खाण्यासाठी योग्य चॉकलेट्सना पसंती

यंदा मुलांना चॉकलेट फटाक्यांचे आकर्षण!
हुबेहूब फटाक्यांचा आकार; खाण्यासाठी योग्य चॉकलेट्सना पसंती
Published on: 
लोगो : आली दिवाळी NSK26H34255; NSK26H34256 जळगाव : दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीस आलेले फटाक्यांचे चॉकलेट्स. यंदा मुलांना चॉकलेट फटाक्यांचे आकर्षण हुबेहूब फटाक्यांचा आकार; बच्चकंपनीसाठी विविध प्रकार बाजारात दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : दिवाळी म्हटली की फटाके, फराळ आणि मिठाईची रेलचेल असते. मात्र, यंदा दिवाळीच्या बाजारपेठेत मुलांसाठी दाखल झालेल्या चॉकलेट फटाक्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्यक्ष फटाक्यांसारखा हुबेहूब आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगळ्या पॅकिंगमुळे या चॉकलेट्सना मुलांकडून पसंती मिळत आहे. फटाक्यांचे स्वरूप असले, तरी ते खाण्यासाठी योग्य असल्याने दिवाळीच्या खरेदीत या चॉकलेट्सची चर्चा होत आहे. दिवाळीत लहान मुलांना फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. याच आवडीचा विचार करून बाजारात फटाक्यांच्या आकारातील चॉकलेट्स उपलब्ध झाली आहेत. फटाक्यांसारखे दिसणारे हे चॉकलेट्स मुलांना सहज आकर्षित करतात. पारंपरिक मिठाई आणि नेहमीच्या चॉकलेट्सपेक्षा काहीतरी वेगळे घेण्याची इच्छा असलेल्या पालकांसाठी हा एक नवीन पर्याय ठरत आहे. भेटवस्तूंसाठीही पर्याय दिवाळीनिमित्त मित्रमंडळी, नातेवाइक आणि लहान मुलांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. यासाठी आकर्षक पॅकिंगमधील चॉकलेट फटाके निवडले जात आहेत. दिसायला फटाक्यांसारखे आणि चवीला गोड असल्यामुळे मुलांना भेट देण्यासाठी त्यांचा विचार केला जात आहे. दिवाळीच्या फराळासोबत अशा नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांचा समावेश करण्याकडेही ग्राहकांचा कल दिसून येतो. नावीन्यपूर्ण उत्पादनांकडे ग्राहकांचे लक्ष सणासुदीच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने दाखल होतात. यंदा चॉकलेट फटाके हा त्यातील एक वेगळा प्रकार आहे. पारंपरिक सणाचा आनंद आणि आधुनिक खाद्यपदार्थांची आवड यांचा मेळ या उत्पादनातून साधला जात आहे. कोट यंदा दिवाळीच्या बाजारपेठेत भेटवस्तू म्हणून चॉकलेट्सचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहे. त्यात चॉकलेट फटाक्यांना लहान मुलांकडून पसंती दिली जात आहे. - शैला चौधरी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.