दुचाकीचा हेडलाईट तोंडावर मारण्यावरुन वाद.

दुचाकीचा हेडलाईट तोंडावर मारण्यावरुन वाद.
Published on: 
मेहरुण चौपाटीवर तिघांकडून चॉपरहल्ला; तरुण गंभीर जखमी दुचाकीचा हेडलाइट तोंडावर मारण्यावरून वाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.३ : दुचाकीची हेडलाइट तोंडावर मारू नका, लाइट बंद करा, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघा अज्ञातांनी ३० वर्षीय तरुणावर चॉपरने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मेहरुण परिसरातील नवीन प्लॉट्स भागात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबापुरा (बिलाल चौक) येथील रहिवासी जाफर खान इक्बाल खान (वय ३०) गुरुवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास मेहरुण तलावाजवळील नवीन प्लॉट्स परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण तेथे आले. त्यांच्या दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडत असल्याने जाफर खान यांनी त्यांना हेडलाइट बंद करण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिघांपैकी एकाने जाफर खान यांच्या डोक्यात चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. तसेच दोघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. गुन्हा दाखल या घटनेनंतर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी जखमीच्या जबाबावरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक गजानन बडगुजर तपास करीत आहेत.
Marathi News Esakal
www.esakal.com