Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Monika Raut, Inspector Jitendra Sapkale etc. during the visit to Bal Jesus Church.
Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Monika Raut, Inspector Jitendra Sapkale etc. during the visit to Bal Jesus Church.esakal

Nashik News: भारतभरातील ख्रिस्ती भाविकांना बाळ येशू दर्शनाची आस! 10, 11 फेब्रुवारीपासून यात्रा

बाळ येशूच्या स्मरणार्थ भारतातले पहिले मंदिर असणाऱ्या नाशिक पुणे रोडवरील उपनगर येथील बाळ येशू चर्चमध्ये १०, ११ फेब्रुवारीला मोठी यात्रा होत आहे.

नाशिक रोड : बाळ येशूच्या स्मरणार्थ भारतातले पहिले मंदिर असणाऱ्या नाशिक पुणे रोडवरील उपनगर येथील बाळ येशू चर्चमध्ये १०, ११ फेब्रुवारीला मोठी यात्रा होत आहे.

भारतातील अनेक ख्रिस्ती भाविक आतापासून बाळ येशूच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सध्या यात्रेला सुरवात झालेली असून, शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बाळ येशूचे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ केला. (Christians all over India hope to see baby Jesus yatra from 10th 11th February Nashik News)

बाळ येशू चर्चमध्ये फादर एरल फर्नांडिस यांनी पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत प्रार्थना केली. या वेळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस उपायुक्त सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, दिनकर कदम, उपनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिक रोड वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके आदींनी यात्रा स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

१० ते ११ फेब्रुवारीला बाळ येशू यात्रा होणार आहे, मात्र भाविक आत्तापासून दर्शनाला येत आहे. ६० ते ७० हजार भाविक दर्शनाकरिता येण्याचा अंदाज आहे. १ ते ९ फेब्रुवारी कालावधीत नऊ दिवसाची विशेष नोव्हेना (प्रार्थना) आयोजित केली जात आहे.

नऊ दिवसाची नोव्हेना व पवित्र ख्रिस्त बलिदान सोहळा (उपासना विधी) रोज सकाळी ६ वाजता (इंग्रजीत), १०. ३० वाजता (मराठीत) दुपारी १२ वाजता (इंग्रजीत), दुपारी ४ वाजता (कोंकणीत) सांयकाळी ६ वाजता (इंग्रजीत) व सांयकाळी ७ वाजता (मराठीत) आयोजित करण्यात येईल.

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Monika Raut, Inspector Jitendra Sapkale etc. during the visit to Bal Jesus Church.
Solapur News : जि. प. कर्मचारी पतसंस्थेची मतदार यादी १३ फेब्रुवारीला अंतिम; हरकतींवर उद्या अंतिम निर्णय; निवडणूक चुरस

१० फेब्रुवारीला सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शामियानात दर तासाला सकाळी ६ ते सांयकाळी ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिसा बलिदान अर्पण केला जाईल. तसेच ११ फेब्रुवारीला सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिसा बलिदान अर्पण केला जाईल.

बाळ येशू यात्रेची सांगता ११ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता होईल. झेवियर शाळेच्या परिसरात व (नाशिक -पुणे महामार्ग) मुख्य रस्त्यावर रहदारी नियंत्रण व समाजविघातक घटकापासून सुरक्षा कारणास्तव कृपया या काळात बंदोबस्ताची व्यवस्था नाशिक पोलिस करणार आहे.

"या वर्षीच्या मेजवानीची थीम येशूची उदारता आहे. येशूमधील आपला देव हा मोठा देव आहे. तो एक अर्जी देव नाही. आपण त्याच्याकडे काहीही आणि सर्वकाही मागू शकतो आणि जर ते आपल्या भल्यासाठी आणि त्याच्या इच्छेनुसार असेल तर तो आपल्याला ते देईल. या वर्षी जगात आणि देशात शांततेसाठी प्रार्थना करणार आहोत."- फादर एरल फर्नांडिस, मुख्य धर्मगुरू.

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Monika Raut, Inspector Jitendra Sapkale etc. during the visit to Bal Jesus Church.
Jalgaon News : डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत जळगाव ग्रामीणमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com