क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करावी : गेडाम

क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करावी : गेडाम
Published on: 
क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करावी डॉ. गेडाम : गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ : शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यात क्रोमियमचे प्रमाण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करावी. भूजलासह पृष्ठभागावरील जलसाठ्यांमध्ये क्रोमियम आढळलेल्या ठिकाणांची व्याप्ती निश्चित करून प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करावा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यंत्रणांना दिले. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी कालबद्ध उपाययोजना कराव्या, अशाही सूचना त्यांनी केल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता.२८) गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण समितीची बैठकीप्रसंगी डॉ. गेडाम बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त विठ्ठल सोनवणे, निरीचे वैज्ञानिक डॉ. गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह इतर अधिकारी प्रत्यक्ष हजर होते. डॉ. गेडाम म्हणाले, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखून नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करावी. तसेच शहरातील भूजलसाठ्यांमध्ये क्रोमियम आढळलेल्या भागांतील प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात. गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी. --- आरोग्य परिक्षण करावे : गेडाम अंबड परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असल्याची शक्यता तपासण्यासाठी महानगरपालिकेने बाधित भागांत आरोग्य शिबिरे आयोजित करून नागरिकांचे आरोग्य परीक्षण करावे. क्रोमियमसह इतर जड धातू आणि जड धातूंव्यतिरिक्त असलेल्या प्रदूषकांचीही तपासणी करावी, असे निर्देश गेडाम यांनी दिले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com