नाशिक- पोलिस आयुक्तालयात सर्वाधिक मोठी हद्द असलेल्या अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून चुंचाळे एमआयडीसी या नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आल्याने अनेक वर्षांपासून उद्योजकांच्या मागणीला यश आले आहे. चुंचाळेसह औद्योगिक वसाहतीमधील चुकीच्या घटनांना पायबंद घालण्यास मदत होईल. आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केल्याने पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. पोलिस ठाण्याला गृह मंत्रालयाने चार पोलिस निरीक्षकांसह १८१ पदे मंजूर केली आहेत.