Nashik News : विधानसभेत गाजले सिडको! आमदार हिरे विधानसभेत आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seema-hire

Nashik News : विधानसभेत गाजले सिडको! आमदार हिरे विधानसभेत आक्रमक

नाशिक : सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याबरोबरच अंबड पोलिस ठाणे व पोलिस वसाहतीचे नूतनीकरण सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन बाह्यवळण रस्त्यासाठी निधीची तरतूद व सिडको सातपूर परिसरातील उघड्यावरील विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीसाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे शुक्रवारी (ता. १७) विधानसभेत आक्रमक झाल्या. (CIDCO became popular in Legislative Assembly MLA Hire aggressive in assembly Nashik News)

अर्थसंकल्पीय चर्चेच्या दरम्यान विधानसभेत आमदार सीमा हिरे यांनी सिडको व सातपूर संदर्भातील विविध प्रश्न मांडले. अंबड पोलिस ठाण्याची इमारत चाळीस वर्षे जुनी झाल्याने तातडीने दुरुस्त करून तेथे अद्ययावत इमारत बांधावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

अंबड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही. समस्यांमुळे अनेकांची कुचंबणा होते. पाथर्डी फाटा व सातपूर भागात असलेल्या पोलिस वसाहतींचीदेखील दुरवस्था झाली आहे, तेथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सातपूर पोलिस ठाण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. इमारत बांधून तयार आहे, परंतु तेथील पोलिस वसाहतींच्या नूतनीकरणासाठी निधी अपुरा पडला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत हिरे यांनी व्यक्त केले.

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी निर्माण केलेल्या पोलिस चौकी कार्यान्वित करण्यासाठी मनुष्यबळदेखील देण्याची मागणी करण्यात आली. पश्चिम मतदारसंघात अंबड आणि साकोऱ्या दोन औद्योगिक वसाहत या संस्थेची उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिका हद्दीतील जकात नाक्यावर ट्रक टर्मिनल उभारण्याची आवश्यकता आहे.

येथे चालकांसाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी एसटीपीची आवश्यकता आहे. त्यासाठी अमृत योजनेत तरतूद करावी त्याचप्रमाणे उद्योजकांचा मालमत्ता कर कमी करावा नाशिक मध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

महापालिकेत भाजपची सत्ता असताना आयटी पार्क, डेटा सेंटर, औद्योगिक पार्क यासाठी प्रयत्न झाले परंतु त्यानंतर प्रकल्प कार्यान्वित झाले नाही अंबड येथील उद्योजकांकडून महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही संस्था फायर सेस वसूल करतात सदरची बाब अन्यायकारक असून त्या संदर्भात तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले

हिरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

- अंबड पोलिस ठाण्याचे नूतनीकरण करावे.

- पाथर्डी फाटा व सातपूर येथील पोलिस वसाहतींचे नूतनीकरण.

- उद्योजकांची दुहेरी फायर सेस च्या जाचातून मुक्तता.

- अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन.

- बंद जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल उभारावे.

- सिडकोतील घरे फ्री होल्ड करून एफएसआय वाढवावा.

"सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याबरोबरच तेथे एफएसआय वाढविणे गरजेचे आहे. उद्योजकांना दुहेरी फायर सेस द्यावा लागतो ती समस्यादेखील सोडवणे आवश्यक आहे."

- सीमा हिरे, आमदार