Municipal Election
sakal
नवीन नाशिक/ इंदिरानगर: सिडको विभागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या दुबार एबी फॉर्म नाट्याचा निकाल अर्ज छाननीअंती जाहीर झाला. यात माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाग्यश्री ढोमसे यांच्यासह पाच जणांची पक्षाची उमेदवारी फेटाळण्यात आली; तर प्रभाग २५ मधून माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर हे तिघेही आता भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.