Municipal Election
sakal
आकाश पगार- नवीन नाशिक: सिडको परिसरातील सर्वात जुना आणि विस्ताराने मोठा असलेला प्रभाग क्रमांक २९ सध्या राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौपाटी, अंबड पोलिस ठाणे, गणेश चौक, पेलिकन पार्क आदी भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे तीन तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आले होते. यंदा राजकीय समीकरणे बदललेली असून भाजप, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मनसे या सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.