Nashik News : कामगार कायद्यातील बदलांच्या निषेधार्थ कंपनी गेटवर आज सिटूचे काळ्याफिती लाऊन आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

Nashik News : कामगार कायद्यातील बदलांच्या निषेधार्थ कंपनी गेटवर आज सिटूचे काळ्याफिती लाऊन आंदोलन

सातपूर (जि. नाशिक) : शिंदे- फडणवीस सरकारने मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून आता सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कामगार कायद्यांमध्ये बदल केला आहे. या बाबत सिटू संघटनेतर्फे कामगार कायद्यातील बदलांच्या निषेधार्थ कंपनी गेटवर उद्या काळ्या फिती लाऊन आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात शिंदे शासनाने कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. (citu black tape protest at company gate today to protest against changes in labour laws Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: YIN Election 2022- 23 : ‘यिन’ची 115 महाविद्यालयांत निवडणूक; येथे करा अर्ज

यात प्रामुख्याने कामगार कल्याण निधी अधिनियम, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम, महाराष्ट्र किमान घर भाडे भत्ता अधिनियम, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम, महाराष्ट्र औद्योगिक संबंध विधेयक या कामगार कायद्यात झालेल्या बदलामुळे कामगारांना किमान वेतन न मिळाल्यास मालकाला सजा करण्याची तरतूद होती.

कामगार कल्याण निधी यामध्ये देखील बदल केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक संबंध विधेयक या कायद्यात देखील सरकारने बदल करून कामगारांना संपविण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी सर्व कामगारांना उद्या (ता.२५) आपापल्या पाळी सत्रात जेवणाच्या सुट्टीत किंवा शिफ्ट सुरु होताना किंवा संपताना कंपनी गेटवर काळ्या फिती लावून निदर्शने करून सरकारने केलेल्या कायद्याच्या बदलाचा निषेध करावा, असे सिटूचे नेते सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा: Nandurbar News : नवापूर साखर कारखान्याचे आज मतदान; उद्या मतमोजणी