Nashik : शहरातील Blackspot चौफुल्या अपघात'मुक्त' कधी होणार?

Hampers thrown on the road after Chili Chauphuli cleared encroachment.
Hampers thrown on the road after Chili Chauphuli cleared encroachment.esakal

नाशिक : मिरची चौफुलीवरील अपघातानंतर पोलिस, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र महिन्याभरात त्याच मिरची चौफुलीचे रुपडे पालटले असून, शहरात असलेल्या अन्य ब्लॅकस्पॉट आहे तशीच आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौफुली ही अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रतीक्षा आहे. (city Blackspot still not accident free Nashik Latest Marathi News)

मिरची हॉटेल चौफुलीवर अपघात झाला म्हणून या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना केल्या गेल्या. मात्र ही एकच शहरात चौफुली आहे का, जिथे अपघात होतात, अन्यही चौफुल्या आहेत, जिथे भीषण अपघात होतात. त्या ठिकाणीही अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे या एकाच चौफुलीवर प्रशासनाने लक्ष केंद्रित न करता शहरातील प्रत्येक चौफुलीवर अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. गेल्या तीन वर्षात एकाच ब्लॅकस्पॉटवर अपघात होऊन ५ वा त्यापेक्षा अधिक बळी वा गंभीर जखमी जात असल्यास त्या स्पॉटला अपघाती स्थळ म्हटले जाते. यात घट झाल्यास ब्लॅकस्पॉटमधून ते अपघातस्थळ वगळण्यात येते. आजमितीस नाशिक शहर हद्दीमध्ये १५ ब्लॅक स्पॉट आहे.

शहरातील ब्लॅक स्पॉट

ट्रक टर्निमल (आडगाव), रासबिहारी चौफुली, शिंदे गाव, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राऊ हॉटेल सिग्नल, के.के. वाघ कॉलेज, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहेडी गाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, तारवालानगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड), पळसे गाव बस स्टॉप.

Hampers thrown on the road after Chili Chauphuli cleared encroachment.
Nashik : ZPच्या आवाहनाला ग्रामविकासासाठी 100 सामाजिक अन् औद्योगिक संस्था सरसावल्या

घटलेले ब्लॅकस्पॉट

शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, स्टेट बँक चौक (लेखानगर), नांदूर नाका सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल.

वाढलेले ब्लॅक स्पॉट

पळसे बस स्टॉप, ट्रक टर्मिनल (आडगाव), एक्स्लो पॉइंट (अंबड-सातपूर लिंक रोड), मिरची हॉटेल सिग्नल.

या उपायांची तत्काळ गरज

प्रत्येक मोठ्या चौफुलीवरील चारही रस्त्यांवर टेबल टॉप स्पीडब्रेकर बसवावे, वेगात आलेल्या वाहनचालकाला आपला वेग मर्यादित करणे भाग पाडण्यासाठी उपनगरी चौफुलीवर रॅम्पल स्ट्रीप स्पीडब्रेकर बसवावे, प्रत्येक चौकात पांढऱ्या रंगांचे झ्रेबा क्रॉसिंग पट्टे असावेत, सिग्नल व्यवस्थेची मागणी असल्यास त्यावर तत्काळ निर्णय होऊन ते बसवावे, ना दुरुस्त सिग्नल यंत्रणा तत्काळ सुरू करावेत, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई

सुरक्षा वाहतूक समिती नावालाच

महापालिका, उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिस शाखा यांची संयुक्त प्रतिनिधींची सुरक्षा वाहतूक समिती असते. या समितीकडून ठराविक कालावधीनंतर शहरातील रस्त्यांची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवरील उपायांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्ष पाहता, सदरील समिती नावालाच असल्याचे बोलले जात आहे.

Hampers thrown on the road after Chili Chauphuli cleared encroachment.
Nashik : महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर बॅरिकेट्स तोडून व्यवसाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com