नाशिक शहर बससेवेसाठी ९ मार्ग निश्चित; ITMS प्रणालीद्वारे होणार संचलन

City-Bus
City-Busesakal

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरु होणाऱ्या शहर बससेवेसाठी टप्पा दर निश्‍चित केल्यानंतर आता बससेवेचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ नऊ मार्ग निश्‍चित करण्यात आले आहे. या नऊ मार्गांवर २४० थांबे निश्‍चित करण्यात आले आहे, तर शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष बस चालविल्या जाणार आहे. बससेवेचे संचलन आयटीएमएस (ITMS) या संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे. (City-bus-service-by-NMC-nashik-city-marathi-news)

आर्थिक फायद्याचे मार्ग निश्‍चित

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली होती.

महापालिकेच्या वतीने शहर बस सेवा सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने पायाभुत सुविधांचा आढावा घेण्यात आला. यातील ९० टक्के काम पुर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर ५० बसेस शहरात चालविल्या जाणार आहे. २७ जून पासून ट्रायल सुरु होईल व एक जुलै पासून बसेस रस्त्यावर धावतील. बससेवा सुरु करण्यापुर्वी २५ जूनला पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. बसेस चालविणाऱ्या चालक व वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिक म्युनिसिपल परिवहन समितीने आर्थिक फायद्याचे मार्ग निश्‍चित केले असून त्यावर बसेस चालविल्या जाणार आहेत.

City-Bus
PM केअर फंडाचे व्हेंटिलेटर नाशिककरांच्या उपयोगात आलेच नाही

बससेवेत नाशिक दर्शन

नियमित बससेवा सुरु झाल्यानंतर ओझर विमानतळ, त्र्यंबकेश्वर, कसारा लोकलला सेवा जोडली जाणार आहे. सेवा तोट्यात जावू नये व पर्यटनाला चालना मिळावी यासाठी ‘नाशिक दर्शन' उपक्रम राबविला जाणार आहे. वाईन उद्योगाला चालना मिळण्यासाठी सुला वाईन साठी देखील विशेष सेवा दिली जाणार आहे. गंगापूर धरणावरील बोट क्लब आदी ठिकाणी मार्गिका निश्‍चित केल्या जाणार आहेत. उत्पन्न वाढीसाठी तपोवन व नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याचे नियोजन केले जणार आहे.

संगणकीय प्रणाली

आयटीएमएस (ITMS) संगणकीय कार्यप्रणालीद्वारे बससेवेचे संचलन केले जाणार आहे. यात बसेसचे मार्ग, किती किती किलोमीटर धावल्या, तिकीट विक्रीतून प्राप्त महसुल याबाबतची माहिती मिळेल. गोल्फ क्लब येथील महापालिकेच्या ईमारती मध्ये कमांड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आले आहे.

City-Bus
नाशिकमध्ये आता विकेंडला लग्नाला परवानगी!

असे आहेत नऊ मार्ग

- तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील,सातपूर अशोकनगर श्रमिकनगर.

- तपोवन सिम्बॉयसीस कॉलेज मार्गे पवननगर व उत्तम नगर.

- तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव सोसायटी.

- सिम्बॉयसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखा नगर, महामार्ग, म्हसरूळ, बोरगड.

- तपोवन ते भगूर मार्गे शालिमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प.

- नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका.

- नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे.

- नाशिक रोड ते निमाणी मार्गे जेल टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन.

- नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी.

(City-bus-service-by-NMC-nashik-city-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com