City Center Mall सिग्नल खड्ड्यात! | Latest marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

potholes latest marathi news

City Center Mall सिग्नल खड्ड्यात!

नाशिक : सिटी सेंटर मॉल सिग्नल चौकात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.

संभाजी चौकाकडून त्रिमूर्तीकडे जाणारा सिग्नल सुटल्यानंतर चौकात असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक संथ होते. तर, खड्ड्यांमुळे वाहनांचे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. यातून गंभीर स्वरूपाचीही घटना घडू शकते. तरी खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. (City Center Mall surrounded by potholes Latest Marathi News)

संभाजी चौक ते उंटवाडी रस्त्यावरील सिटी सेंटर मॉल सिग्नल आहे. या ठिकाणी संभाजी चौकाकडून उंटवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील सिग्नलच्या चौकातच मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच, पुढे म्हसोबा मंदिरालगत असलेल्या रस्त्यावरही खड्डे आहेत.

गेल्या आठवडाभरापासून पाऊस थांबला आहे. मात्र, तरीही या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. याउलट वाहतुकीमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहने वेगात निघतात.

हेही वाचा: Dhule : सत्तेत असूनही BJP प्रशासनापुढे हतबल

मात्र, चौकात आणि पुढे काही अंतरावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनांची गती संथ होते. त्यातून एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन किरकोळ अपघात होत आहेत. विशेषत: खड्ड्यांमुळे दुचाकी बंद पडतात.

खड्ड्यांमुळे वाहने वाहनांवर आदळणे अशा स्वरूपाच्या घटना घडून वादावादीचे प्रकार घडत आहेत. यातून मोठी दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे सदरील ठिकाणचे खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारक करीत आहेत.

हेही वाचा: धुळ्याचे सफाई कर्मचारी राज्यपालांकडे

Web Title: City Center Mall Surrounded By Potholes Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..