Nashik Congress News: निष्ठावानांना घेऊन शहर काँग्रेसची पक्षबांधणी; शहरातील पाचही विभागात प्रभारी नियुक्त

Congress
Congress esakal

Nashik Congress News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला बाजूला सारत शहर काँग्रेसने पक्षातील ज्येष्ठ, निष्ठावानांना घेऊन पक्ष बांधणीला सुरवात केली आहे.

याचाच भाग म्हणून उमेदवारांची चाचपणी विविध ब्लॉकमध्ये बैठका घेणे यासाठी प्रदेश काँग्रेसचे जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे व शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी शहरातील पाच ब्लॉकमध्ये प्रभारी नियुक्त केले आहेत. यात प्रामुख्याने पक्षाच्या निष्ठावानांना संधी दिली आहे. (City Congress party building with loyalists Appointed in charge in all five divisions of city nashik)

शहर काँग्रेसतंर्गत असलेली गटबाजीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत तक्रारी झाल्या. या गटबाजीमुळे पक्षाला सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष मिळाला होता. पक्षाचे जुने, ज्येष्ठ व निष्ठावान पक्षापासून दूर गेलेले आहे.

मात्र, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी शहर काँग्रेसने सुरू केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Congress
NMC News: धोकादायक वाडे खाली करण्यासाठी पोलिसांची मदत

यासाठी निष्ठावानांना सोबत घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. यासाठी शहरातील पाच ब्लॉकमध्ये प्रभारी नियुक्त करत त्यांना पक्ष कार्यात घेतले आहे. यात मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारी पदी ज्येष्ठ नेते नंदकुमार कर्डक,

नवीन नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी माजी सभागृहनेते राजेंद्र बागूल, पंचवटी ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीप शर्मा व नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी माजी सभागृहनेते डॉ. सुभाष देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव राहुल दिवे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हनीफ बशीर, वत्सला खैरे, आशाताई तडवी, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, युवकचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, एनएसयूआय अध्यक्ष अल्तमश शेख, ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, विजय पाटील, बबलू खैरे, दिनेश निकाळे, कैलास कडलक यांनी स्वागत केले आहे.

youtube.com/watch?v=SRpIc4CBuGw
Congress
Nashik Monsoon Crisis: वरुणराजाच्या ‘बॅकलॉग’मुळे कृषी पंढरीवर काळजीचे ढग; उत्तर महाराष्ट्रात 54 टक्के कमी पाऊस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com