Nashik Traffic Problem: शहराला वाहतूक कोंडीचा विळखा! नाशिककरांच्या डोक्याला ताप; जागोजागी वाहतूक कोंडी

Nashik Traffic Problem
Nashik Traffic Problemesakal

Nashik Traffic Problem : ऐनसणासुदीच्या काळात शहरातील वाहतुकीच्या समस्येने नाशिककर बेजार झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

अगदी पोलीस आयुक्तालयपर्यंत वाहनांचा रांगा लागूनही ढिम्म अशी वाहतूक पोलीसांची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची टीका त्रस्त नाशिककर करीत आहेत. (city facing traffic jam! Head fever of Nashik people Traffic jams everywhere nashik)

येत्या रविवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होताे आहे. त्यापार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

तसेही शहराच्या मध्यवर्ती परिसरातून जाणार्या रस्त्यांवर सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत वाहनांची रहदारी वाढून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे स्मार्ट रोडवरील सीबीएस, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ आणि रविवार कारंजा या चौकांमध्ये वाहतूक कोंडी हाेते.

त्याचप्रमाणे, मुंबई नाका सर्कल, सीटी सेंटर मॉल, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, मखमलाबाद नाका, काट्या मारुती चौक या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात.

विशेषत: या रस्त्यावरील बहुतांश ठिकाणी अनधिकृतरित्या वाहनांच्या पार्किंग होत असल्याने त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या अनधिकृत पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नाही.

यामुळे बेशिस्त दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक बिनधास्तपणे वाहने पार्क करून खरेदीसाठी बाजारपेठेत जातात.

Nashik Traffic Problem
Traffic Transport Block : पनवेल स्थानकात आणखी नवीन ट्रॅफिक वाहतूक ब्लॉक!

परंतु यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्यांना हकनाक वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. ही समस्या नेहमीची झाली असून, सर्वसामान्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टोईंग नसल्याचा परिणाम

गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाहनांची टोईंग बंद आहे. नवीन प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. टोईंग असते तेव्हा नोपार्किंगमध्ये वाहने पार्क करण्याची भिती वाहनचालकांमध्ये असते.

परंतु टोईंगच बंद असल्याने वाहनचालक-मालकही बिनधास्तपणे वाहने पार्क करून त्यांच्या कामाला निघून जातात. टोईंग असली की वादावादीचे प्रसंग घडतात परंतु नो पार्किंगमध्ये व वाहने पार्क करण्याचे प्रमाण कमी होते.

वाहतूक पोलिसांकडे ऑनलाईन इ-चलान मशिन आहे. परंतु ते तेही करीत नाहीत. उलट वाहतूक सिग्नलवर विनाहेल्मेट, सिग्नल जंपींगच्या केसेस करण्यामध्येच त्यांना धन्यता वाटते.

Nashik Traffic Problem
Nashik Traffic News: नादुरुस्त बसमुळे वाहतूक खोळंबली! मुंबई नाक्याकडे जाताना वाहनांच्या लागल्या रांगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com