Nashik News : शहरातील रस्ते होणार काँक्रिटचे!; डांबरीकरणावर फुली

concrete Road
concrete Roadesakal

नाशिक : जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची गुणवत्ता घसरल्याने टीकेला सामोरे जावे लागणाऱ्या बांधकाम विभागाकडून आता यापुढे नवीन रस्ते तयार करताना सिमेंट काँक्रीटचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहस्थ निधीच्या माध्यमातून होणारे रस्ते काँक्रिटचे केले जाणार आहे. (City roads will made of concrete tarification rejected Nashik Latest Marathi News)

नाशिक शहरात जवळपास अडीच हजार किलोमीटरचे रस्ते आहे. यातील ९५ रस्ते डांबरीकरणाच्या माध्यमातून, तर ५ टक्के रस्ते काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून विकसित झालेल्या रस्त्यांची गुणवत्ता दीर्घकाळ टिकते. विशेष म्हणजे काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसाळ्यात फारसे खड्डे पडत नाही. डांबरीकरणाच्या संदर्भात मात्र उलट अनुभव आहे. वर्षभरात डांबरीकरण उघडण्याबरोबरच ठेकेदारांचे पालन पोषण करण्यासाठी डांबरीकरणाचे रस्ते केले जातात, असा आरोप केला जातो. मागील दोन ते अडीच वर्षात शहरात जवळपास साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात आली.

मात्र, यंदाच्या पावसाळ्यात गुणवत्तेचे पितळ उघडे पडले. जागोजागी खड्डे पडल्याने, तर अनेक भागात रस्तेच वाहून गेल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाला अजूनही टीकेला सामोरे जावे लागत आहे. सध्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतिपथावर असले तरी यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात मानहानी झाली. जनहित याचिकेपासून तर रस्त्यावर आंदोलन करण्यापर्यंत अनेक प्रकार यंदाच्या पावसाळ्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून दिसून आले.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

concrete Road
DPDC Meeting : डीपीडीसीच्या बैठकीत गाजले अवैध धंदे!; शहरातील अमली पदार्थ विक्रीवर खडाजंगी

रस्ता तयार झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांना डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अर्थात देखभाल- दुरुस्तीसाठी तीन वर्ष मुदत असते. त्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती होत असली तरी हा व्यवहार परवडणारा नाही. त्यामुळे यापुढे शहरात नवीन रस्ते तयार करताना सिमेंट व काँक्रिटच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. खर्च अधिक लागला तरी चालेल, मात्र सिमेंट काँक्रीटचा रस्ता दीर्घकाळ टिकत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

रिंगरोडही काँक्रिटचा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात बाह्य रिंगरोड विकसित केला जाणार आहे. सदरचा रिंगरोड विकसित करतानादेखील काँक्रिटच्या रस्त्याला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी अधिकचा खर्च येत असला तरी गुणवत्ता दीर्घकाळ टिकत असल्याचा अनुभव आहे. नाशिक शहरात महात्मा गांधी रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला. अद्यापही या रस्त्याची गुणवत्ता कायम आहे. गावठाण विकासांतर्गत स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणातदेखील काँक्रिटचे रस्ते तयार केले जात आहे.

concrete Road
Nashik News : आठवड्यात मान्यता, महिन्यातच वर्कऑर्डर; आचारसंहितेपूर्वी कामांसाठी दादांचा फॉर्म्युला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com