मालेगाव- ‘माझी वसुंधरा’ या योजनेंतर्गत शहरातील अनेक भिंती बोलक्या होणार आहेत. या भिंतींच्या माध्यमातून महापालिकेतर्फे जनतेला स्वच्छता व झाडे लावा, झाडे जगवा, नशामुक्त मालेगाव यासह विविध स्वरूपाची चित्रे काढून वेगळा संदेश देण्याचे काम येथे सुरू आहे. येथील प्रभाग एकमध्ये या कामाला सुरुवात झाली. महापालिकेच्या शाळा क्रमांक १४ जवळच्या रस्त्याच्या भिंतीवर येथील मालेगाव गर्ल्स हायस्कूलचे चित्रकला शिक्षक सलमान अहमद यांनी ७० ते ८० चित्रे काढून भिंती बोलक्या केल्या आहेत.