शहरात कचयाचे प्रमाण वाढले

शहरात कचयाचे प्रमाण वाढले
Published on: 
टूडे साठी ------------ शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले कॉलनी, नगरांमध्ये सणानंतर अस्वच्छता कायम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदी-विक्री मुळे मोठ्या प्रमाणात घनकचरा बाहेर पडला. गेल्या बारा दिवसात चार नोव्हेंबरला सर्वाधिक कचरा (९६६ टन) शहरातून जमा झाल्याची नोंद आहे. दरम्यान दिपावली संपल्यानंतर सुट्टीचा माहोल असल्याने त्याचा परिणाम स्वच्छतेवर दिसून येत आहे. कॉलनी, नगरे तसेच छोट्या सोसायट्यांमधील रस्ते अद्यापही झाडले जात नसल्याने अस्वच्छता दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या अहवालानुसार २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारीनुसार ४ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक ९६६ टन कचऱ्याचे संकलन झाले होते. तर ११ नोव्हेंबर रोजी हे प्रमाण घसरून ७६२ टनांवर आले. २८ ऑक्टोबरला ९२३ टन, २९ ऑक्टोबरला ८९६ टन, ३० ऑक्टोबरला ८९२ टन आणि ३१ ऑक्टोबरला ८८९ टन कचऱ्याचे संकलन झाले होते. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रमाण पुन्हा वाढले. २ नोव्हेंबर रोजी ९६१ टन, ४ नोव्हेंबर रोजी ९६६ टन आणि ५ नोव्हेंबर रोजी ९५१ टन कचरा संकलित झाला. त्यानंतर मात्र संकलनाच्या वजनात हळूहळू घट होत गेली. ८ नोव्हेंबर रोजी ८७३ टन, ९ नोव्हेंबरला ८४२ टन कचरा जमा झाला. १० नोव्हेंबर रोजी हे प्रमाण पुन्हा वाढून ९१७ टनांवर गेले, तर ११ नोव्हेंबर रोजी ते अचानक ७६२ टनांवर घसरले. दिवाळीच्या काळात कचऱ्याचे प्रमाण वाढणे अपेक्षित असताना ११ नोव्हेंबरला झालेली ही घट लक्षवेधी ठरली आहे. -------------------- दुर्गंधी, डासांचे प्रमाणात वाढ दरम्यान शहरात सध्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कॉलनी आणि नगरांमधील स्वच्छता अद्यापही व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते आणि चौक झाडले जात असले तरी आतील भागातील रस्ते, मोकळ्या जागा आणि नाल्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी कचरा वेळेवर उचलला न गेल्याने नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.