नाशिक- शहराची वाढती पाण्याची तहान भागविण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेतून अमलात आणायच्या २८४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेत पाचही मक्तेदार अपात्र ठरल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी असलेली पाच वर्षांची अट आता दहा वर्षे करण्याचा निर्णय घेतल्याने परिणामी चार मक्तेदार पात्र ठरले. त्यात सोलापूर येथील लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या कंपनीची निविदा प्राकलन दरापेक्षा कमी दराची प्राप्त झाल्याने महापालिकेची जवळपास ३५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.