Citylinc Fare Hike : नव्या वर्षात शहर बससेवेत 7 टक्के दरवाढ; पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc news

Citylinc Fare Hike : नव्या वर्षात शहर बससेवेत 7 टक्के दरवाढ; पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

नाशिक : शहर तसेच शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना बस सेवा पुरविणाऱ्या महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीने बस तिकिटांच्या दरात सात टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रादेशिक परिवहन महामंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून पुढच्या आठवड्यापासून ही दरवाढ लागू होऊ शकते. (Citylinc Fare Hike 7 percent hike in city bus fares in New Year Implementation from next week Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News: मलनिस्सारण केंद्रांसाठी 530 कोटींचा प्रस्ताव; केंद्र सरकारकडून NMCला मंजुरीची अपेक्षा

महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेचे हे दुसरे वर्ष आहे. ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर सिटीलींक कंपनीने बससेवा चालविण्यास दिली आहे. त्यामुळे करारानुसार दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करावी, असे नमूद आहे. डिझेल व सीएनजी इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या वर्षी सात टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सिटीलिंक कंपनीच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात आला होता.

महापालिका हद्दीपासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत सिटीलिंक कंपनीकडून बससेवा पुरवली जात असल्याने भाडेवाढ करताना प्रादेशिक परिवहन महामंडळाची परवानगी आवश्यक ठरते. त्यानुसार २९ डिसेंबरला बैठक होऊन त्या बैठकीसमोर भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सात टक्के भाडेवाढीला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.

त्यामुळे आता सिटीलिंक कंपनीच्या बसचे तिकीट दर सात टक्क्यांनी वाढले आहे. पुढील आठवड्यांपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी दिली.

हेही वाचा: Nashik News : उद्यानांची दुरवस्था टवाळखोरांच्या पथ्यावर; खेळणी, ग्रीन जिम साहित्यांची मोडतोड