ओझर-थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दिक्षी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ओझर टाऊनशिप, सुकेणे, नाशिक, पिंपळगाव आदी परीक्षा केंद्रांवर परिक्षेसाठी जावे लागते; परंतु पाच ते सहा दिवसांपासून दिक्षीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ओझर गावातील महाराणा प्रताप चौक येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता बंद केला. यामुळे ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांची कोंडी होते.