Civil Hospital : वाहने करा पार्क अन् खुशाल जा

Civil Hospital parking latest marathi news
Civil Hospital parking latest marathi newsesakal

नाशिक : बहुतांशी शासकीय, निमशासकीय नोकरदार हे शहर परिसरात राहत असल्याने, सकाळी नोकरीच्या ठिकाणी जात असताना ते त्यांची दुचाकी वाहने जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बिनधास्त पार्क करतात.

सायंकाळी पुन्हा परत आल्यानंतर दुचाकी घेऊन जातात. मात्र, या साऱ्याचा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून, रुग्णालयात उपचार वा रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होते आहे. (Civil Hospital Nashik become parking zone Nashik Latest marathi news)

महसुल, शिक्षण, आरोग्य या शासकीय सेवेमध्ये शेकडो अधिकारी- कर्मचारी असतात. यातील बहुतांशी अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी निवासाला असणे बंधनकारक आहे.
असे असतानाही हे अधिकारी- कर्मचारी बदलीच्या ठिकाणी निवासाला राहत नाहीत.

नाशिकपासून दीड- दोन तासांच्या अंतरावर बदलीचे ठिकाण असेल तर हे अधिकारी- कर्मचारी नाशिकमध्येच वास्तव्याला असतात. या कर्मचाऱ्यांना ठक्कर बाजार, मध्यवर्ती बसस्थानकातून जाण्यासाठी बस असतात. मात्र, या ठिकाणी दुचाकी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नाही.

तसेच, या ठिकाणाहून दुचाकी चोरीचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे यापेक्षा सोयीची आणि सुरक्षित जागा, तसेच या दोन्ही बस स्थानकापासून नजीक असलेल्या जिल्हा रुग्णालयाची पार्किंग अधिक सोयीची या नोकरदारांना उपलब्ध झालेली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्क करण्यासाठी मुबलक जागा तर आहेच, रुग्णालयाचे प्रवेशद्वार दिवसरात्र सुरू असल्याने सोयीची जागा झाली आहे. अनेक नोकरदार हे सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्क करतात.

तेथून पायी बसस्थानक गाठतात. नोकरीच्या गावी जातात आणि सायंकाळी परत आल्यावर वाहन घेऊन घरी जातात. काही नोकरदार तर दोन-तीन दिवस परतत नाहीत. त्यांची वाहने जिल्हा रुग्णालयातच पडून असतात. मात्र, या साऱ्याचा ताण जिल्हा रुग्णालयावर पडतो आहे.

Civil Hospital parking latest marathi news
दुषित पाण्यानंतर आता कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने महिलावर्ग त्रस्त

रुग्णांच्या नातलगांना मात्र त्रास

रुग्णालय आवारातील नर्सिंग महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंगची सुविधा आहे. या ठिकाणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने पार्क केली जातात. तर, रुग्णालयात येणाऱ्या अन्य व्यक्तींच्या वाहनांना इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करण्याची सोय आहे.

या ठिकाणी सुरक्षारक्षक आहेत. परंतु, काहीजण हे सुरक्षारक्षकाला न जुमानता आरक्षित वाहनतळाच्या ठिकाणी वाहने पार्क करतात. त्यामुळे अनेकदा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना वाहने पार्क करण्यासाठी जागा राहत नाही. बाहेरील व्यक्तींनी या ठिकाणी वाहने लावू नये असे सूचना फलक लावले आहेत. मात्र, बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांकडून याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.

"बाहेरगावी नोकरी करणारे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने पार्क करीत असतील तर त्याविरोधात कारवाई केली जाईल. सुरक्षारक्षकांना सूचना देऊन वाहने पार्क करणाऱ्यांची शहानिशा केली जाईल. " - डॉ. उत्कर्ष दुधेडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

Civil Hospital parking latest marathi news
मालेगावी 2 वर्षांनंतर अद्रकाच्या भावाची उसळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com