नाशिक: हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने नाशिक महापालिकेसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८७ कोटींच्या निधीपैकी ७५.४२ कोटी खर्च झाले आहेत. उर्वरित निधी खर्च करताना दमछाक होत आहे. त्यात महापालिकेची निवडणूक नसल्याने दोन वर्षांपासून शासनाने निधी अडवून धरला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच निधी प्राप्त होण्याच्या आशा आहेत.